विश्व हिंदू परिषद हिरकणीहिरक महोत्सवी वर्षानिमित्त संघटन सेवा क्षेत्राचा विस्तार करणार -महामंत्री मिलिंद परांडे

0
94

कोल्हापूर प्रतिनिधी – राजेंद्र मकोटे

कोल्हापूर – भारतातील सर्व राज्यात आणि सर्व जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत करत असलेल्या , यंदा 60 व्या हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली सेवा क्षेत्रासह देश विदेशात संघटन विस्तार करणार आहे ‘ अशी माहिती केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी जिव्हेश्वर समाज हॉलमध्ये ते हितचिंतक मेळाव्यात बोलत होते .

प्रांरभी सर्वाचे स्वागत जिल्हामंत्री विधीज्ञ सुधीर जोशी – वंदूरकर यांनी केले . महाराष्ट्र गोवा बार असोशिएशनचे अध्यक्ष विवेक घाडगे यांनी विहिप आणि सहयोगी संस्था ची विविध सेवा कार्य समाजासमोर प्रकर्षाने यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली .

घाटगे सह ज्येष्ठ कार्यकर्ते हसमुखभाई शहा – प्रफुल्ल जोशी यांचे ही श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले .

आपल्या हितगुजुवर मनोगतामध्ये मिलिंद पराठे पुढे म्हणाले की समाजातील सकारात्मक वाढवण्यासाठी विविध सेवा कार्यातून विश्व हिंदू परिषदेने गेली 60 वर्षात बजरंग दल – मातृशक्ती – दुर्गा वहिनी या आपल्या सहयोगी संस्थामार्फत मोठे योगदान असल्याचे दिले असल्याचे नमूद करत ‘ जगभरातील हिदू ची काळजी भारती य हिंदु नी घ्यावी अशी वाढत चाललेली मानसिकता हेच विहीप च्या व्यापक कार्याची प्रचिती असल्याचेही त्यांनी आग्रहाचे सांगितले .

ऑस्ट्रेलिया देशात स्वस्तिक -चिन्ह बचाव आंदोलन यशस्वी होणे आणि कॅलेफोर्निया मध्येही त्याचे अनुकरण होणे या मोठ्या सकारात्मक घटना आहेत , स्वस्तिक चिन्ह हे हिंदू – जैन सह समस्त भारतीय सांस्कृतिक विश्वाचे प्रतिक असल्याचेही यामुळे पुनः एकदा अधोरित झाल्याचे त्यांनी नमूद केले .

मिझोराम नागालँड मध्ये हिंदुची संख्या कमी होणे त्यामुळे झालेले दुष्परिणामआपण बघत आहोतच पंजाब मधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक होत आहेत याकडे सर्वांनीच गंभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे ही आग्रहाने सांगत घर वापसी साठी व्यापक प्रमाणात विहिप प्रयत्न करत असून त्यात समाजातील सर्व घटकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले .

यावेळी भाजपा खासदार धनंजय महाडीक – अशोक देसाई आप्पा लाड – श्रीकांत पोतनीस – दिलीप मैत्राणी – श्वेता कुलकर्णी – मातृशक्ती च्या सौ . बंबलकर – माधव कुंभोजकर – अनिरुद्ध कोल्हापुरे – केशव गोवेकर सह विहिप – बजरंग दल चे कोल्हापूर – इचलकंरजी – पन्हाळा – कोडोली – कागल मधील पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here