सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे आंबा येथे उदघाटन :- माननीय उपवनसंरक्षक यांच्या हस्ते संपन्न

0
139

प्रतिनिधी -उज्वला लाड

दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत वनक्षेत्र तसेच वन्य जीवांचे प्रभावी व्यवस्थापनाचे अनुषंगाने, पुनर्रचनेनुसार ‘निसर्ग पर्यटन केंद्र,आंबा , ता. शाहुवाडी , जि. कोल्हापूर येथे सुरू करण्यात आलेल्या , वन परिक्षेत्र सह्याद्री व्याघ्र राखीव आंबा , या कार्यालाचा ‘उदघाटन समारंभ सोहळा’ संपन्न झाला.


उपवनसंरक्षक प्रादेशिक विभाग , कोल्हापूर मा.श्री.जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री . उत्तम सावंत ,उप संचालक कोयना , सह्याद्री व्याघ्र राखीव , मुख्यालय कराड यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. शासकीय स्तरावर इको टुरिझमच्या दृष्टिकोनातून अनेक प्रस्ताव तयार आहेत .

त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली , यामध्ये परिक्षेत्रात 150 टेन्ट उभे केले जातील , इको टुरिझम विकासासाठी या परी क्षेत्रात टेरिटोरियल, वाइल्ड लाईफ , माहिती , आंबा व कोकण दर्शन , नेचर लवर्स तसेच निसर्गाचा अभ्यास करणारे विद्यार्थी , अभ्यासक , यांच्यासाठी वनस्पतींचे संवर्धन व फुलपाखरांचे संवर्धन अशा अनेक गोष्टी निर्माण करण्यात येणार आहेत.

त्यामुळे निसर्ग व पर्यटक निसर्ग अभ्यासक यांचा ओघ या भागात वाढेल , त्याचप्रमाणे जंगल सफारी पारंपारिक पद्धतीने बैल गाडीतून सफारी अशा गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील .

ठीक ठिकाणी माहिती चे बोर्ड लावणे , देवराई संवर्धन , या सर्व माध्यमातून निसर्ग पर्यटन वाढवण्याच्या संकल्पना त्यांनी मांडल्या. निसर्गाचे संवर्धन करता करता त्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल अशा ही संकल्पना त्यांनी मांडल्या .

ही सर्व माहिती ईडीसीच्या वेबसाईटवर ऑनलाइन दिसणार आहे , धुपा सारख्या दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन तसेच जतन करणे यासारख्या योजना राबविण्यात येणार आहेत.

व या सर्वांची माहिती मिळवण्यासाठी एक ॲप तयार केले जाईल अशा माध्यमातून या वनपरिक्षेत्राचा विकास केला जाईल.


सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव या विभागाकडे आंबा वन परिक्षेत्र हस्तांतरित झाल्यामुळे या परिक्षेत्रात वाघ, व्याघ्र कुळातील बिबटे वगैरे प्राणी त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. पशु संपत्ती बरोबरच वनसंपदा ही आधुनिक काळाची गरज आहे.असे त्यांनी नमूद केले.


या कार्यक्रमासाठी मा. श्री. उत्तम सावंत , उपसंचालक कोयना , सह्याद्री व्याघ्र राखीव मुख्यालय, कराड ,मा.श्रीमती स्नेहलता पाटील , उपसंचालक चांदोली, सह्याद्री व्याघ्र राखीव मुख्यालय कराड, मा. श्री.रामलिंग चव्हाण , तहसीलदार शाहुवाडी, मा. श्री राजेंद्र सावंत्रे , पोलीस निरीक्षक शाहूवाडी , मा.श्रीमती अमृता साबळे, तहसीलदार देवरुख , मा. श्री प्रदीप पवार , पोलीस निरीक्षक देवरुख , मा. श्रीमती समता वायकुळ , सरपंच , आंबा , मा. श्री नंदकुमार नलावडे, परीक्षेत्र अधिकारी चांदोली तसेच मा. अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्याघ्र राखीव , आंबा मा. श्री.शशुपाल पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी पाटण , मा.श्री सागर पोवार, परिमंडल वन अधिकारी , मा. श्री सुरेश सर आपले परिमंडल वन अधिकारी , मा. श्री अरविंद पाटील वनसंरक्षक , मा. श्री संजय कांबळे , वनपाल अधिकारी , मा.श्री बाबा गद्रे , मा. श्री. निलेश कामेरकर , मा. श्री. अनिल गवरे , मा. श्री डॉक्टर जी.पी. लाड , दैनिक गगन तारा रिपोर्टर सौ. उज्वला लाड, सरपंच केरले मानोली, चांदोली , मा. श्री. किशोर बागम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


उदघा टनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थिततांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते. अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here