गोकुळ’ची सभा वादळी : मूळ सभासद गप्प; पण कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

0
139

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील : गोकुळ’च्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी करत महाडिक समर्थक सभेत घुसले. पोलिसांकडून ठराव पाहूनच सभासदांना सोडले जात असताना यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स तोडून सभेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.

पाटील आणि महाडिक अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे प्रचंड घोषणाबाजी पहायला मिळाली. ‘गोकुळ’च्या या सर्वसाधारण सभेसाठी ग्रामीण भागातून दूरवरून सभासद आले.

पण या सभासदांना ‘गोकुळ’चे अध्यक्ष महोदय काय बोलतात? ते काय वाचत आहेत ? हे कळायला मार्ग नव्हता. त्यांच्याकडे फक्त गप गुमान बसल्याशिवाय पर्याय नव्हता. केवळ कार्यकर्त्याची दंगाबाजी पहायला आलो की काय ? अशी चर्चा महिला व इतर सभासदांमध्ये सुरु होती.

गोकुळ दुध संघाची ६१ वी सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली आहे. गोकुळची सभा आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलं असतं. प्रत्येकवर्षी गोकुळची सभा वादळी होत असते.

त्यामुळं गोकुळची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. बैठकीच्या निमित्तानं आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटातील वातावरण तापलंय. गोकुळच्या सभेआधी महाडिक गटानं सभेच्या परिसरात पोस्टरबाजी केली आहे.

उत्तर द्या म्हणत महाडिक गटानं गोकुळ दूधसंघाच्या कारभाऱ्यांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी (दि. १५) पार पडली, सभेच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल केल्यामुळे सभेला गदारोळ होण्याची शक्यता आदीच वर्तवली जात होती.

दरम्यान, सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्यावतीने तयारी करण्यात आली होती, तरी विरोधकांनी जोरदार विरोध करत आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच सत्ताधारी गटाकडून गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळाले.

गतवर्षी सभेच्या ठिकाणाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी वातावरण तापविले होते. यावर्षी ‘गोकुळ’ने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना परिसरातच सर्वसाधारण सभा ठेवली होती.

अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते.

सभेच्या पूर्वसंध्येलाच संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल करत कारभार सुधारा; अन्यथा ‘गोकुळ’चा शेतकरी संघ होईल, असा इशारा दिला. त्यामुळे सभेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

दरम्यान, तयारी पूर्ण झाली असून, सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती.

तर बाजूलाच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती.

सभेपूर्वी मार्गावर पोस्टरबाजी 

दरम्यान, सभेच्या मार्गावर विरोधी महाडिक गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दोन वर्षात किती लिटर वासाचे दुध परत केले? कर्मचाऱ्यांना काम करू द्या, सततच्या बदल्या आणि म्हशी घेण्यासाठी दबाव कधीपर्यंत? कर्मचाऱ्यांची पिळवणूक कधी थांबणार? आमचं दुध नाकारलं, राजकारण केलं आणि बाहेरच्या राज्यातून 5.5 कोटी लिटर दूध खरेदी केले कशासाठी? उत्तर द्या. बाराशे संस्था नक्की काय साधलं?  रणजित धुमाळांकडे कोणत्या विभागाचा दूध विक्रीचा ठेका? 

आजवरचा इतिहास पाहता गोकुळच्या सभा या एक मिनिटांमध्ये गुंडाळण्यापासून ते खुर्च्या बांधून घालण्यापर्यंत पराक्रम घडले आहेत. त्यामुळे आजच्या सभेत पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सभेवर देखरेख असणार आहे.

 तत्पूर्वी, गुरुवारी सत्ताधारी तसेच विरोधी आघाडीकडून पत्रकार परिषद घेत सभेच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यात आली होती.

यावेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. संघाबाबत प्रश्न विचारल्यावर सतेज पाटील काही बोलत नाहीत.

कारण संघ म्हणजे महाडिकांचे ठेके आणि टॅंकर एवढ्यापुरतेच त्यांचे ज्ञान मर्यादित आहे, असेही शौमिका महाडिक म्हणाल्या.

दुसरीकडे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, सभा शांततेत पार पाडावी असे आवाहन यावेळी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here