उज्वला लाड आंबा
खास गणेश उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान पुणे ,मुंबई रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली , सांगली , इस्लामपूर , बेळगाव या मार्गावर खास पुण्याहून तब्बल 220 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे .
अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या मुंबई व ठाणे विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे 200 बसेस सोडण्यात येणार आहेत.
तसेच पुणे ( स्वारगेट,पिंपरी चिंचवड, निगडी हिंजवडी ) येथून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी एकूण 220 जादा फेऱ्या असणार आहेत.ही ज्यादा फेऱ्यांची सोय 15 ते 18 सप्टेंबर या कालावधीत असणार आहे.
गणेश उत्सवासाठी मुंबईचे चाकरमाने सहकुटुंबासहित आपापल्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या अगोदर 4 दिवस गाड्यांना प्रचंड गर्दी असते , या पार्श्वभूमीवर लोकांची येण्या जाण्याची सोय व्हावी , म्हणून बसेसच्या जादा फेऱ्यांची आवश्यकता असते .
गणेशोत्सव कालावधीमध्ये विभागांतर्गत प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळा बस स्थानक , इचलकरंजी बस स्थानक या महत्त्वाच्या बस स्थानकावरून इस्लामपूर सांगली ,मिरज निपाणी , बेळगाव , गडहिंग्लज , गारगोटी , आजरा ,चंदगड या मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.