उज्वला लाड :- आंबा
शाहूवाडी तालुक्यातील पेंढाखळे येथील हर्षद युवराज पाटील याने एशियन माऊंटन बाइसिकल गेम मध्ये कौतुकास्पद कामगिरी करत राष्ट्रीय संघात निवड होण्याचा मान मिळवला आहे.
निवड होणारा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. सध्या तो केरळ येथे प्रशिक्षण शिबिरात पुढील शिक्षण घेत.
टीव्हीवरील सायकलिंग स्पर्धा बघून शाळेत असताना त्याने सायकलिंग मध्ये करिअर करण्याचे ठरविले.
पेंडाखळे सारख्या दुर्गम भागात त्याचे बालपण गेले. रेसिंग साठी लागणाऱ्या सायकली मात्र महागड्या असतात , परंतु शेतकरी असलेल्या वडिलांनी मुलाची जिद्द पाहून त्याला आर्थिक पाठबळ दिले.
शालेय स्तरावर , तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. परंतु पेंढाखळे हे गाव ग्रामीण व दुर्गम गाव असल्यामुळे त्याने पुढील सरावासाठी कोल्हापूर येथे येण्याचा निर्णय घेतला , त्याचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे, तरीसुद्धा मुलाची जिद्द परिश्रम पाहून त्याला आर्थिक व नैतिक पाठबळ देण्याचे काम त्याच्या वडिलांनी केले.
या खेळास लागणाऱ्या सायकलच्या किमती लाखोच्या घरात असतात तरीसुद्धा त्याला सरावासाठी कोणत्याही सुविधा कुटुंबियांनी कमी पडू दिल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर हर्षद ने सुद्धा जिद्द ,सातत्य, चिकाटी , व परिश्रम च्या जोरावर यश मिळवत राष्ट्रीय संघापर्यंत निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे.
या खेळात निवड होणार तो पहिलाच खेळाडू आहे. त्याची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे व ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा देणारी आहे.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया कडून त्याचा केरळ येथील निवड चाचणीसाठी समावेश करण्यात आलेला आहे. मेन्स ज्युनिअर संघामध्ये त्याची निवड झालेली आहे.
गेल्या 8 वर्षापासून तो यासाठी तयारी करीत आहे.
अशाप्रकारे ग्रामीण भागातून येऊन वेगळ्या वाटेवरच्या करिअरची संधी निवडल्याबद्दल हर्षद चे हार्दिक अभिनंदन.