मराठवाड्याला ४५ हजार कोटींची भेट; मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांची घोषणा

0
78

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्याला जलसिंचन व्यतिरिक्त इतर विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे. औरंगाबादमधील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. यामुळे 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यानंतर विविध प्रकल्पांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण साठ हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

आदर्श पतसंस्थेच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन लोकांचे पैसे देणार आहोत. खासदार जलील हे काही वेळापूर्वीच मला भेटले होते, असे शिंदे म्हणाले.

फडणविसांचे विरोधकांवर आरोप…

बऱ्याच वर्षांनी मंत्रीमंडळ बैठक मराठवाड्यात होत आहे. विरोधकांनी ही बैठक होऊ नये यासाठी प्रयत्न केला. 2016 मध्ये 31 विषय होते आणि 2017 मध्ये आढावा बैठक घेतली होती.

त्यावेळी 10 विषय पूर्ण झाले होते. आता आढावा घेतल्यानंतर 23 विषय पूर्ण झाले आहे. वॉटर ग्रीड संदर्भात टेंडर काढले होते. उद्धव ठाकरेंनी या योजनेची हत्या केली, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here