नवकार मंत्राच्या जयघोषात ध्वजारोहणाने षोडशकरण – दशलक्षण महापर्वास प्रारंभ – आर के नगर येथे भव्य साठ हजार फुट कलात्मक मंडपाची उभारणी : प्रतिमा विद्या प्रतिष्ठान वतीने आयोजन

0
144

कोल्हापूर – सकाळ च्या मंगलमय वातावरणात प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात पाच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या कलात्मक वीस हजार फूट भव्य साठ हजार फूट कलामंडपामध्ये षोडशकरण आणि दशलक्षण महाप्रर्वास प्रारंभ होत आहे .

सकाळी परमपूज्य नियम सागर जी महाराज यांच्यासह पवित्र सागर जी महाराज , वृषभसागरजी महाराज , अभिनंदन सागरजी महाराज , सुपार्श्व सागरजी महाराज , श्रुतमती माजाजी , समनामती माताजी , शुल्लक संयमसागर जी आदिच्या प्रमुख उपस्थितीत मंत्र शुद्धीकरणासह प्रवेश जलभिषेक आणि ध्वजारोहण याभव्य आध्यात्मिक सोहळ्यास भक्ती – भावमय वलयात प्रांरभ झाला .

यानंतर सकाळी नऊ वाजता प.पू नियमसागरजी महाराज यांचे प्रवचन झाले . त्यांनी दर्शन विशुध्दी भावना पूजन विषय हितगुजपर विवेचन केले . त्यानंतर सात्विक भोजनाने सकाळ च्या सत्राची सांगता झाली .

सायंकाळ चा सत्रात ही यांच विषयावर प्रवचनात त्यांनी विवेचन केले . त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . आगामी दिवसात षोडशकरण सह .क्षमा – मार्दव – आर्जव – शौच – सत्य – संयम – तप – त्याग – आकिंचन्य – ब्रम्हचार्य या दशलक्षणा विविध पैलू नी त्यागी – व्यासंगी मुनीजन आपल्या अधिकार वाणी दारे विवेचन करणार आहेत .

या भव्य कार्यक्रमासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांमध्ये अधिक काळ अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले – ए के कामते – राजु शेठे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्या समावेत कार्यरत आहेत . त्यांनी शहरासह सांगली – हुपरी – इचलकंरजी – कोडोली – वारणानगर – बाहुबली – आजरा – चंदगड आदीसह पन्नास हून अधिक गावात भेटी देवून प्रत्यक्ष भेटीसह आंमत्रणे दिली आहेत .

या भव्य सोहळ्याच्या ठिकाणी आर के नगर – पाचगांव – कणेरी मार्गावरील सर्व केएमटी बसेस चा विनंती थांबा ही आसणार आहे , तरी या सोहळ्याचा सर्वानी लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकुंटुंब – सह परिवार भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घ्यावा असे आहवान संयोजक प्रतिमा विघा प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here