रोगमुक्त व निरोगी जीवनासाठी नियमित सकस आहार महत्त्वाचा मुख्याध्यापिका – विश्रांती मुंडे

0
66

कोल्हापूर : प्रतिनिधी वैभव प्रधान

करंजफेण येथे पाककृती व तृणधान्य महोत्सव उत्साहात.

आजच्या या आधुनिक व धावपळीच्या आणि फास्ट फुडच्या जमान्यात मानवाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रत्येक घरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यावरती रामबाण उपाय म्हणजे नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात नियमित वापर व्हावा असे प्रतिपादन मुख्याध्यापिका विश्रांती मुंडे यांनी केले.

करंजफेण ,ता. राधानगरी येथील प्राथमिक शाळा, शाळा व्यवस्थापन समिती व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाककृती स्पर्धा व तृणधान्य महोत्सव उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी ढेरे होते .यावेळी केंद्रप्रमुख संजय पाटील, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शितल वागरे ,रवींद्र कांबळे ,मनीषा वागरे, गीता कांबळे ,संजय पाटील, विद्या वागरे विठ्ठल आलंगदार प्रमुख उपस्थित होते .

कार्यक्रमाचे स्वागत बालाजी राख यांनी केले. के. एच. पाटील यांनी प्रास्ताविक केले वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून सूप्त कलागुणांना वाव मिळत असल्याने शाळा व महाविद्यालयानी केवळ महिलांच्यासाठी लोक सहभागातून शैक्षणिक उठावांतर्गत स्पर्धेचे आयोजन करून महिलांच्या कर्तुत्वाला वाव द्यावा असे आवाहन केंद्रप्रमुख संजय पाटील यांनी केले.

अंगणवाडी ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या महिला पालकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला .


स्पर्धेचे परीक्षण सौ.सरोज दांडेकर सौ संगीता पाटील यांनी केले. विजेत्या अनुक्रमे प्रशांती कांबळे ,मनीषा वागरे ,पल्लवी वागरे, सुजाता वागरे व करिष्मा मांगोरे यांना गृहउपयोगी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच जयश्री वागरे उपसरपंच रेखा कांबळे ,सर्व सदस्य बाजीराव जोशी ,रंजना कुंभार, पोलीस पाटील सविता पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापन कमिटी सर्व सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या वागरे यांनी केले.तर आभार शितल वागरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here