रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भविष्यातील निवडणुकीसाठी स्वबळाचाच नारा देणार- राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे

0
68

कोल्हापूर प्रतिनिधी – वैभव प्रधान

कोल्हापुरातील निर्धार मेळाव्यात केला एल्गार.

“भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची” हे ब्रीद घेऊन भविष्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर निवडणुका लढवेल असा यल्गार कोल्हापूर जिल्हा कार्यकर्त्यांच्या समवेत राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केला.

कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे “एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष” निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते.

राजाभाऊ सरवदे म्हणाले, महायुतीमध्ये आम्ही अनेक वर्ष  आहोत. एक-दोन वेळा याच युतीमध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं.


पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला मात्र स्थानिक पातळीवर कोणतंही पद व कोणतीही प्रतिष्ठा भाजपा आणि सर्व पक्षांच्या युतीच्या माध्यमातून आरपीआयला मिळताना दिसत नाही आणि पक्ष उभा करणाऱ्या कार्यकर्त्याला जर सन्मान मिळत नसेल तर स्वबळाचा नारा देऊन स्वाभिमानी विचार जोपासत आम्ही भविष्यातील निवडणूक लढवू असा इशाराही भाजप महायुतीला सरवदे यांनी

दिला. ते म्हणाले,सत्ता का असावी ?हे मी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचा अध्यक्ष असताना अनुभवलेल आहे.

त्यात सत्तेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांची कामे करता येतात आणि जर निळा झेंडा खांद्यावरती घेऊन पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर एखादं काम मिळवून देता येत नसेल तर तो पक्ष काय कामाचा आणि म्हणूनच हा पक्ष स्वबळाचा नारा देत आहे असं त्यांनी सांगितलं.

राज्य उपाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पक्ष निरीक्षक विवेक कांबळे म्हणाले, रिपब्लिकन पक्ष मोठा करण्यासाठी सर्व जातीसमूहांना सामावून घेऊन बाबासाहेबांच्या स्वपनातला महापक्ष निर्माण करायचा आहे.

कोल्हापूरच्या या पुरोगामी नगरीमध्ये रिपब्लिकन पक्ष मोठ्या दिमाखात उभा आहे. याचा मला खूप आनंद आहे. हा उभा करण्यामध्ये उत्तम कांबळे या जिल्हाध्यक्षांन मोठं योगदान दिलेल आहे.

असं सांगून जर उत्तमदादाला बदला अशी भाषा करत असेल तर त्यांनी ती थांबवावी कारण भविष्यात जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम कांबळेच असतील असा ठाम विश्वास त्यानी दिला.

राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, संविधान सर्व माणसाला माणुसकीने जगण्याचा संदेश देते आणि तोच विचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्व दूर आपण पोहोचवत आहोत व पोहोचवावा लागेल.

अध्यक्षीय मनोगतात उत्तम कांबळे म्हणाले, सुरुवातीलाच महायुतीत आम्ही गेल्यानंतर आम्हाला एकाद दुसरं समितीचं सदस्यपद देऊन भाजपने गाजर दाखवलं परंतु आता अनेक प्रस्थापित पक्ष त्यांच्याबरोबर चिकटल्यानंतर ते आरपीआय सारख्या घटक पक्षाला विसरले आहेत.

पण लक्षात ठेवा आम्हाला राजकारणाचा डाव मांडता येतो. तो डाव आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने कधी मागे घेतो पण वरिष्ठांनी जर परवानगी दिली तर तो कसा खेळायचा आणि तो खेळल्यानंतर भाजपचं काय होईल हे देखील त्यांनी पहावं.

कारण आम्ही विचारांचा रिपब्लिकन पक्ष उभा केलेला आहे ते. त्यांनी विसरू नये असा इशारा देत कोल्हापूर हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहील हा शब्दही त्यांनी राज्याध्यक्ष व पक्ष निरीक्षकांना दिला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मेळाव्यात पाच ठराव मांडण्यात आले. या ठरावांमध्ये हातकलंगले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून महायुतीतून तो मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पॅंथर पासून आतापर्यंत आरपीआयशी आणि आठवले साहेबांशी एकनिष्ठ असणाऱ्या मंगलराव माळगे या जेष्ठ कार्यकर्त्याला, नेत्याला उमेदवारी मिळाली पाहिजे.

असा प्रमुख ठराव करण्यात आला. याला सर्वांनीच टाळ्यांच्या आणि घोषणांच्या निनादांमध्ये दाद दिली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शनामध्ये राज्य सचिव मंगलराव माळगे,प.म.उपाध्यक्ष बी.आर. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं. तर स्थानिक पदाधिकारी तथा तालुका व विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.

यामध्ये बाळासाहेब वशिकर, तानाजी कांबळे, बाबासाहेब कागलकर, जयपाल कांबळे, अविनाश आंबपकर, दिलीप कांबळे, नामदेवराव कांबळे,युवा आघाडीचे अविनाश शिंदे, शहराध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर,कामगार आघाडीचे गुणवंत नागटिळे यांनी आपल्या भावना व निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीक,र गजानन कांबळे,अमर कदम यांसहित हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी तर प्रास्ताविक मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव प्रधान यांनी केले. तर आभार कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रदीप मस्के यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here