कोल्हापूर दि 16 -सकाळच्या च्या मंगलमय निनादात कोल्हापूर येथील प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात या महोत्सवाचा आरंभ झाला.
शेंडा पार्क येथील 5 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात 65 हजार फूट क्षेत्रात षोडशकरण आणि षोडशकार अर्थात दशलक्षण महापर्वास प्रारंभ होत आहे .
सकाळच्या सत्रात परमपूज्य नियम सागर जी महाराज यांच्यासह प पु पवित्र सागर जी महाराज , प पु वृषभसागरजी महाराज ,प पु अभिनंदन सागरजी महाराज , प पु. सुपार्श्व सागरजी महाराज , श्रुतमती माताजी , समतामती माताजी , क्षुल्लक संयमसागर जी आदि मुनींसंघाच्या प्रमुख उपस्थितीत
ममंत्रोपच्चार शुद्धीकरणासह प्रवेश झाला आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून भगवंताना जलाभिषेक करून भक्तिमय सोहळ्यास प्रांरभ झाला . यानंतर सकाळी 9 वाजता प.पू नियमसागरजी महाराज यांचे धर्मप्रवचन झाले . त्यांनी दर्शन,विशुध्दी भावना पूजन आदी विषयी श्रावकांसमोर धर्मसवांद साधला . त्यानंतर सात्विक भोजनाने सकाळ च्या सत्राची सांगता झाली .
सायंकाळ च्या दुसऱ्या सत्रात उपदेशपर प्रवचन केले. आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . आगामी दिवसात षोडशकरण सह दशलाक्षणिक मधील 10 धर्माची उपासनेत क्षमा – मार्दव – आर्जव – शौच – सत्य – संयम – तप – त्याग – आकिंचन्य – ब्रम्हचार्य या दशधर्माची महती त्यागी -मुनींगण आपल्या विदवत वाणीद्वारे करणार आहेत.
या ऐतिहासिक धर्म सोहळ्यासाठी कोल्हापूर स्थित प्रतिमा विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त मंडळी अहोरात्र कार्यरत आहेत गेल्या 3 महिन्यांपासून ह्या सोहळ्याची तयारी सुरू आहे.संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीस सचिन बहिरशेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले – ए के कमते – राजु शेटे यांच्यासह जैन श्रावक – श्राविका तसेच युवक युवतींचा सहभाग लाभत आहे.
हुपरी – इचलकंरजी – कोडोली – वारणानगर – बाहुबली – आजरा – चंदगड या ठिकाणासह शहरी आणि ग्रामीण भागातील जैन धर्मीयांच्या कडून मुनिसंघाचा आहार- विहार व्हावा यासाठीचे निमंत्रणे दिली जात आहेत .
आर के नगर ( शेंडा पार्क ) येथील षोडशकार महापर्व सोहळ्याच्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी आर के नगर – पाचगांव – कणेरी मार्गावरील केएमटी बसेस चा विनंती थांबा असेल या वाहतूक व्यवस्था संयोजक समितीने केलेली आहे
या पवित्र धर्मसोहळ्याचा धर्मप्रेमी श्रावक आणि श्राविकेनी दर्शनलाभ पुण्यलाभ घ्यावा असे अवाहन संयोजक प्रतिमा विघा प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे .