आशिकी 3′ चं गाणं लीक, चाहत्यांना आली अंकित तिवारीची आठवण, म्हणाले, ‘अरिजीतला ब्रेक…’

0
72

राहुल रॉय (Rahul Roy) आणि अनु अग्रवाल (Anu Agrawal) यांचा सुपरहिट ‘आशिकी’ (Aashiqui) सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यानंतर 2013 साली याचाच सिक्वल आला.

यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. ‘आशिकी 2’ (Aashiqui 2) सुद्धा सुपरहिट झाला आणि काही दिवसांपूर्वीच ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) ची घोषणा झाली. यामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aryan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान ‘आशिकी 3’मधील अरिजीत सिंहच्या (Arijit Singh) आवाजातील गाणं लीक झालं आहे.

सोशल मीडियावर अरिजीत सिंहच्या फॅन पेजवर एक गाणं लीक झालं आहे. हा ‘आशिकी 3’ मधला ऑडिओ असल्याचा दावा पेजने केला आहे. ‘वो जो तेरा हाल था कभी, वो जो तेरा प्यार था कभी…भूल जा!’ असे गाण्याचे बोल आहेत.

हे ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. तसंच या गाण्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here