अवैध रेती वाहतूकीवर एलसीबीची कारवाई, ४० लाख ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
60

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

नागपूर : जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण भागातून होत असलेल्या अवैध रेती वाहतूकी विरोधात कंबर कसली आली. ग्रामीणच्या एलसीबी पथकाच्या माध्यमातून कुही, पाचगाव, मौदा भागातून होत असलेल्या रेती वाहतूकीवर कारवाई करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने पाचगाव फाट्याजवळ रेतीची विना परवाना वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परला पकडले. त्यांच्या ट्रकांमध्ये १६ ब्रास रेतीचा साठा आढळून आला. एलसीबीच्या पथकाने ट्रकसह ४० लाख ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कुही, मौदा या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत असल्यासंदर्भात लोकमत सातत्याने वृत्त प्रकाशित करीत आले आहे.

प्रत्येक पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय, आरटीओ यांच्याकडे विना परवाना रेती वाहतूकीसाठी वाहतूकदार एन्ट्री देत असल्याने अवैध रेती वाहतूकीवर कारवाईच होत नव्हत्या.

परंतु नव्याने आलेले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एलसीबीला कारवाईचे पूर्ण अधिकार दिले असून, एलसीबीकडून कुठल्याही विभागाची मूरवत केली जात नाही.

बुधवारी सकाळी अवैध रेती प्रकरणी केलेल्या कारवाईत नितीश मालोडे (३०, रा. निलज, ता. पवनी) व विशाल मोहोडकर (३० रा. धुरखेडा, ता. उमरेड) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. दोन्ही टिप्पर पाचगाव ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आशिष मोरखडे, मयूर ढेकले, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मिलींद नांदूरकर, राकेश तालेवार यांनी केली.

– घाटामध्ये पार्टनर असलेल्याचाच टिप्पर

या कारवाईत पकडण्यात आलेल्या टिप्परचा मालक एका घाटात पार्टनर असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. त्याची पोलीस विभागात चांगली पकड आहे. मात्र एलसीबीने त्याचेही ट्रक ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here