परीक्षेत कॉपी करून दिली नसल्याच्या रागाने शिक्षकांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी!

0
186

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील


भिवंडी : तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाच्या पेपर लिहिताना परीक्षार्थी विद्यार्थ्याला कॉपी करून न दिल्याने विद्यार्थ्यांने महाविद्यालया बाहेर जाऊन आपल्या सहकाऱ्याला महाविद्यालयात बोलावून त्या सहकार्याने पर्यवेक्षक शिक्षिकेसह,सुपरवायझर व महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्रचार्यांना शिवीगाळ व जीवे ठार मारल्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना देशातील प्रसिद्ध बी.एन.एन महाविद्यालयात गुरुवारी घडली आहे.

याप्रकरणी पर्यवेक्षक शिक्षिकेने शिवीगाळ करणाऱ्या इसमा विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. बिएनएन महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेच्या भूगोल विषयाचा पेपर सुरु असतांना पेपर लिहीत असलेला रुपेश बनसोडे हा वारंवार कॉपी करत होता त्याला समज दिल्यानंतरही तो न ऐकता कॉपी करत राहिला.

या प्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा प्रेमनाथ मिटकर वय २३ वर्ष यांनी पुन्हा कॉपी केली तर प्राचार्यांना सांगेन असे बोलल्यानंतर रुपेश यास राग आल्याने तो पेपर सोडून परीक्षा केंद्राच्या बाहेर गेला व त्याने आपला साथीदार दादू गायकवाड याला याबाबत सांगितले.

त्यांनतर दादू गायकवाड याने परीक्षा हॉलमध्ये येऊन पर्यवेक्षिका प्रतीक्षा यांना शिवीगाळ व आरडाओरड केली.

यावेळी परीक्षा हॉलमध्ये महाविद्यालयाचे इतर शिक्षक व सुपरवायझर तसेच प्राचार्य वाघ सर व उपप्राचार्य सुवर्णा रावळ या आल्या असता त्यांनाही शिवीगाळ केली, तर उपप्राचार्य रावळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पर्यवेक्षिका प्रतीक्षा मिटकर यांनी नारपोली पोलीस ठाण्यात आरडाओरड व शिवीगाळ तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दादू गायकवाड या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here