घराघरात गौराईचे जल्लोषात स्वागत :विविध पदार्थांच्या नैवेद्यांनी गौराईची पूजा

0
92

आंबा प्रतिनिधी -उज्वला लाड

गणेश उत्सव सण संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरा होत आहे. 21 सप्टेंबर रोजी जेष्ठा गौरींचे आवाहन झाले . या पाठीमागे असा समाज आहे की, गौराईच्या रूपात पार्वती माहेरपणाला येते त्यामुळे गौराईच्या आगमनानंतर गोडधोडाचा नैवेद्य करून गौराईला दाखवला जातो.

तसेच तिच्यासाठी संपूर्ण घर रांगोळी काढून सजविले जाते. गौराईच्या आगमन दोन दिवसांसाठी असले तरी तिच्यासाठी दररोज वेगवेगळे नैवेद्य केले जातात. महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पदार्थ चे नैवेद्य गौराईला दाखवले जातात.


महाराष्ट्रातील कोकणात मात्र गौराईची वेगळ्या प्रकार पूजा केली जाते. पहिल्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीच्या पानाच्या पातोळ्या व पाच भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो व संध्याकाळी मात्र गौराई साठी मांसाहारी नैवेद्य दाखविण्याची प्रथा कोकणात आहे. ही परंपरा एका पौराणिक कथेवर आधारित आहे….


ज्यावेळी माता पार्वती गौराईच्या रूपाने माहेरपणाला येते तेव्हा तिचे खूप लाड केले जातात , परंतु ती च्या सोबत असणारे रक्षक भूतगणांना मांसाहार प्रिय असल्यामुळे गौराई सोबत या भूतगणांसाठी मांसाहार चा नैवेद्य दाखविला जातो.

परंतु गणपती ला मात्र मांसाहार वर्ज्य असल्यामुळे गणपती व गौराईच्या मध्ये एक पडदा धरला जातो , व गौराईच्या रक्षक भूतगणांना वडे मटन , कोंबडी वडे, तसेच तळ कोकणात काही भागात मासे चिंबोऱ्या त्यांचाही नैवेद्य दाखविला जातो.

त्यानंतर पाचव्या दिवशी घरगुती गणपती बरोबरच या गौराईचे वाहत्या पाण्यात मनोभावे आरती करून यथावत विसर्जन केले जाते. अशाप्रकारे बऱ्याच अनोख्या परंपरांपैकी कोकणातील ही एक वेगळी परंपरा ठरते.


विदर्भ मराठवाड्याकडे मात्र गौराईला सात्विक आणि शाकाहारी अन्नाचेच नैवेद्य दाखवले जातात , अशाप्रकारे विविध भागात , विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here