कोकरुडच्या मातोश्री विद्यालयात रंगला खेळ मंगळागौरीचा

0
80

कोकरुड प्रतिनिधी – प्रतापराव शिंदे

विद्यालयातील विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मातोश्री हिराई देशमुख प्राथमिक शाळा व निनाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूड यांच्या वतीने खास गणेश उत्सवानिमित्त मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका ज्योती निकम ,मीनाक्षी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रारंभी चिंचोलीचे आयुर्वेदरत्न डॉ. नंदकुमार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून पहीली पासून बारावी पर्यंतच्या सर्व वर्गाच्या मुलींनी सहभाग घेवून गौरीची अप्रतिम गाणी खेळासह सादर केली. उपस्थित पालक वर्गांनी त्यांना टाळ्या वाजवून मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी
विद्यार्थ्यांनीच्या तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. अंगणवाडी ते चौथीच्या गटात पहीली व दुसरीच्या वर्गांनी प्रथम क्रमांक पटकावला. पाचवी ते आठवीच्या गटात आठवी अ च्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला.

नववी ते बारावीच्या गटात दहावी च्या मुलींनी उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाजीराव घोडे, पत्रकार प्रतापराव शिंदे, हिम्मतराव नायकवडी, बिळाशीच्या सरपंच सुजाता देशमाने ,चिंचोलीच्या सरपंच कविता पाटील, नेलेॅच्या सरपंच वर्षा पाटील , कोकरूड ग्रामपंचायतीच्या सदस्य विजया चितळे, माया सुतार ,अंजली वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान पाटील , शिक्षिका ज्योती निकम ,मीनाक्षी पाटील ,संध्या पाटील, ललिता सुतार, कविता पाटील, छाया पाटील
जयश्री खोत, किनरे मॅडम, बारगीर मॅडम, वाघमारे मॅडम,पाडळकर मॅडम जाधव मॅडम,कुंभार मॅडम
शिक्षक दिनकर माने ,शंकर पाटील ,मनोहर कांबळे, विकास जाधव ,सुशांत सौदी ,आनंदा पाटील ,मणिराम चौधरी,तानाजी पोतदार, किरण वाघमारे, श्रीकांत पाटील, विलास नांगरे,किरण वाघमारे, कोंडीबा गायकवाड, तसेच शिक्षिका जयश्री खोत, किनरे मॅडम, बारगीर मॅडम, वाघमारे मॅडम,पाडळकर मॅडम जाधव मॅडम,कुंभार मॅडम आदींसह विद्यार्थी , शिशिक्षकेतर कर्मचारी महिला पालक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here