समाजरत्न पुरस्काराने मच्छिंद्र कांबळे यांना गौरवण्यात येणार.
नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाच्या नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
त्या दिनाच औचित्य साधून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रविवारी 24 सप्टेंबर रोजी 3.00 वाजता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात सत्यशोधक जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ फुले, शाहू,आंबेडकरवादी विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांना तर सत्यशोधक समाजरत्न पुरस्काराने बहुजन ऐक्य चळवळीचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे,डॉ.नवनाथ शिंदे, ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांना गौरवण्यात येत आहे.
यावेळी मी महात्मा फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग होणार असून ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांचं मार्गदर्शनही होणार आहे.
या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीतील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी केले.