कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर – प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात सुरू असलेल्या पूर्यषण पर्व – दशलक्षण सोहळ्यात आज महत्त्वाचा ‘ आचार्य भक्ती ‘सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .
परमपूज्य नियमसागर मुनीजी यांच्या अमृतवाणी च्या प्रवचनाने या सोहळ्याला एक मोठी अध्यात्मिक उंची लाभली . या यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अनिल पाटील आणि मान्यवराची होती .
संयोजक प्रतिमा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाटील -उपाध्यक्ष सुरेश भोजकर सचिव सुनील साळवे -सचिन भाई शेख कार्याध्यक्ष अमर मार्ले ,राजू शेठे यांनी आमदार पाटील यांच्यासह मान्यवरांचे स्मृतिचिन्ह आणि पंचरंगी शेला देऊन स्वागत केले . ‘
डॉ . डी वाय पाटील परिवार – समुहाचा नेहमीच जैन समाजाशी स्नेहबंध राहीला आहे – हा धागा अधिक घट्ट करण्यासाठी आपण आज उपस्थित राहून एक प्रेरणा घेतली असल्याचे भावपूर्ण मनोगत आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले .
माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि परिव राने या सोहळयास या भव्य मैदानात जागा उपलब्धी साठी मोलाचे सहकार्य करत एक दिवसाचे आहार दान देगणी दिली यासाठी कार्याध्यक्ष अमर मार्ले यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले .
यावेळी आचार्य भक्ती निमित्त झालेल्या कार्यक्रमात ‘ वीरश्री महिला मंडळ -नागाव पार्क राजारामपुरी महिला मंडळ – प्रतिमा विद्या प्रतिष्ठान महिला आघाडी – सरोजिनी मसुटे – शर्मिला पाटील – वर्धन वर्धमान महिला मंडळ कळंबा , रविवार पेठ – घाडगे कॉलनी महिला मंडळ , सुरेखा पाटील सचिन साजणे यांच्या समूहांनी भक्तिमय नृत्यांनी नृत्य सादर केली . आचार्य भक्तीतील जयमला – भारती -दीप – धूप – जल – चंदन – पुष्प – नैवेद्य आदी अविष्कार सादर केले . कोल्हापूर पंचक्रोशी सह सांगली बेळगाव निपाणी कडोली बाहुबली इचलकरंजी आदि ठिकाणाहून आलेल्या भक्तगणानी आचार्य भक्ती सह सात्विक भोजना चा आस्वाद घेतला ..