
भारतीय बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून रॉयल एनफील्ड बुलेटची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
दमदार इंजन आणि जबरदस्त लुकमुळे ग्राहकांना रॉयल एनफील्ड बुलेट मोठ्या प्रमाणात आवडते.
या दिवाळीत तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन बुलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी रॉयल एनफील्ड कंपनी इलेक्ट्रिक बुलेट लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
हे जाणुन घ्या की सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, कार्स आणि बाईकची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेत कंपनी लवकरच इलेक्ट्रिक बुलेट देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.
कंपनीकडून इलेक्ट्रिक बुलेटचे प्री-प्रॉडक्शन देखील सूरु करण्यात आले आहे.
रॉयल एनफिल्डने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अनेकांचे म्हणणे आहे की लवकरच नवीन इलेक्ट्रिक बाईक दोन वेरियंटमध्ये बाजारात आणली जाईल.
2025 पर्यंत या इलेक्ट्रिक बाइक्स सादर केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. पण दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा लूक सर्वांसमोर येणार आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण अनेक नवीन बाईक आणि कार देखील पाहणार आहोत. मात्र, यावेळी सर्वजण रॉयल एनफिल्ड बुलेटच्या इलेक्ट्रिक मॉडेलची आतुरतेने वाट पाहत असतील.
जर रॉयल एनफील्ड बुलेट इलेक्ट्रिक लाँच केले तर त्यात नवीन काय पाहायला मिळणार? त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. सध्या ही स्वतःच एक अतिशय अनोखी बाईक असणार आहे.
नवीन स्त्रोतांद्वारे हे उघड झाले आहे की रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बुलेटला 14 किलो वॅट तास क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.
त्याची बॅटरी सामान्य चार्जरने चार्ज होण्यासाठी 7 ते 9 तास घेते. फास्ट चार्जरने 4 तासांच्या आत चार्ज होईल आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की कंपनी या बाईकसह वेगवान चार्जिंग प्रदान करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की नवीन बुलेट एका चार्जमध्ये 190 ते 200 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
यात फीचर्स म्हणून अतिशय शक्तिशाली आणि प्रगत उपकरणे दिली जातील. यामध्ये तुम्हाला मोबाईल कनेक्टिव्हिटी, बॅटरी इंडिकेटरसह राइडिंग मोड तसेच एबीएस, नेव्हिगेशन, ब्लूटूथ, एलईडी लाइटिंग आणि इतर अनेक फीचर्स मिळतील.
या बाईकची किंमत 2,60,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. मात्र हे लक्षात ठेवा ही अधिकृत माहिती नाही.
कंपनीकडून इलेक्ट्रिक बुलेटचे प्री-प्रॉडक्शन देखील सूरु करण्यात आले आहे.