नारी शक्ती आणि एकीचे बळ या दोन्ही शब्धांचा जेव्हा मेळ होतो तेव्हा कोणताच काम अशक्य वाटतं नाही.
याच आमच्या सर्वांच्या अनुभवातल उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी ची आई आंबाबाई च्या सेवेशी अर्पण केलेली महागोधडी असूदे नाहीतर यावर्षी चा महागणपती साठी चा २१ फूटी महाशेला असूदे.
सर्वांच्या सहभागातून तयार झालेली कलाकृती ही सुंदरतेचा अनुभव देते
संस्कार शिदोरी मंच च्या माध्यमातून महिलांना गोधडी च्या प्रशिक्षण सोबत अनेक पॅटर्न मधून रोजगार देण्याच काम चालू आहे .
त्या सोबतच आशा एकी निर्माण करनाऱ्या उपक्रमातून नवीन कलाकृती तयार होत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे
मोठ्या कलाकृती करायच्या म्हणेजे अनेकांचे सहकार्य मेळवणे गरजेच असत .
यात अनेकांचा सहभाग हा मोठा असतो तो आपले पनाचा असतो.त्यातलच एक नाव लगोरी फाउंडेशन अध्यक्ष @शुभांगी साखरे जिला काही सांगा हो करूया की काय ,कस करायचं बोल. इथेच निम्म काम पूर्ण होत.
आणि दुसर म्हणजे अग्रवाल डिज़ाइनर हब चे नितीन भैया त्यांनी विणकाम केल्यानंतर जे जोडकाम केले जाते ते अगदी सुंदर रित्या पुर्ण केल.सरिता गवळी,नेहा मोर,शितल रसाळ,कविता पाटील,अपूर्वा भुर्के,दिपा,सुनंदा जाधव या सर्व मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले .
त्यांमुळे आशा प्रकारे एकी च्या माध्यमातून अनेक उपक्रम पुर्ण करू शकतो