कोल्हापुरात मद्यधुंद अवस्थेत आलिशान कारचालकाची टेम्पोला धडक, दोन महिला गंभीर जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

0
192

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : दारुच्या नशेत असलेल्या भरधाव आलिशान कारचालकाने टेम्पोला धडक दिल्याने दोन महिला गंभीर झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून.

कोल्हापुरात फुलेवाडी रिंग रोडवर ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.फुलेवाडी रिंग रोडवर टेम्पो जात होता. टेम्पोमध्ये दोन महिला होत्या. यावेळी समोरून आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील आलिशान कारचालकाने भरधाव वेगात टेम्पोला थेट धडक दिली.

या धडकेत कार जाग्यावर फिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. कारने धडक दिल्याने टेम्पोमधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

टेम्पोला धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेमधील कारचालक फरार झाला. या अपघाताची द्रुश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here