कोल्हापूर – शाहुवाडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असणार व आनंदराव पाटील तात्या भेडसगावकर यांनी दुर्गम अशा शाहुवाडी तालुक्यात सड़क से संस्था वाडी वस्तीवर स्थापन करून गोरगरीब जनतेला आर्थिक प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले.
जिल्हा दूध संस्मर गोकुळ) संघात संचालक म्हणून काम पाहताना त्यांनी गोरगरीबांच्या कुटुंबाला आर्थिक स्त्रोत दूध संस्थाच्या माध्यमातून करून दिला तर भोगवे तो शाहुवाडी येथे गोकूळ दूध संघाचा शितकरण प्रकल्प उका करून सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
त्याचबरोबर कुणी न राहो दुर्बच अज्ञ म्हणून हा शिक्षण यज्ञ या संतोक्तीप्रमाणे भेडसगांव येथे आनंद माध्यमिक विद्यालय व आनंद प्राथमिक अश्रम शाळा अशा शाळांची स्थापना करून गोरगरीब, वंचित, भटक्या समाजातील मुलांना ज्ञानाच्या प्रवाहान आहे आणले.
याच आनंद विद्यालयामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री शिवाजी श्रीपती पाटील (बापू) यांना शिक्षकेत्तर पदावर रुजू करून घेतले. उद्या दि. 30/05/2023 रोजी शिवाजी बापू यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भेडसगाव येथे आयोजित केला आहे.
आनंदराव पाटील तात्या यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडुन २५ वर्षे सेवेत कार्यरत अकणारे शिवाजी बापू कबराक, प्रामाणिक व होतकरू व्यक्तीमत्व आहे. त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्या देणेसाठी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.