कोकरुड प्रतिनिधी -प्रतापराव शिंदे
बिळाशी ता. शिराळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय कृष्णा रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर उपसरपंच सुवर्णा साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीचे सदस्य विजय रोकडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
दरम्यान दुपारी २ वाजता विद्यमान सरपंच सुजाता देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शरद खोत यांनी काम पाहिले.
यावेळी माजी उपसभापती आनंदराव पाटील, प्रचितीचे उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक एस. वाय. यमगर, निनाईचे संचालक बाजीराव पाटील, स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील, माजी सरपंच विश्वास पाटील,
सरपंच सुजाता देशमाने यांच्या हस्ते नुतन उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विजय रोकडे यांचा शाल, श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच कल्पनाताई यमगर, दत्तात्रय शिराळकर,माजी उपसरपंच सुवर्णा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मगदूम, चंद्रकांत साळुंखे, विनायक पाटील, विकास पांढरे, सुवर्णा पाटील, सरिता पाटील, इंदुताई यमगर, विलास रोकडे, अभिजीत देशमाने, संभाजी लोहार, डॉ. इंद्रजित यमगर, दिलीप भोगावकर, आनंदराव शिराळकर, दिलीप पाटील, संतोष पाटील, विलास पाटील, राहुल पाटील, अंकुश पाटील, आनंदा रोकडे, जगन्नाथ रोकडे, सर्जेराव रोकडे, धनाजी पाटील, अमित यमगर, वैभव सातपुते, आनंदा जगताप, डॉ. संभाजी फडतरे आदींसह गावातील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. निवड कार्यक्रम झाल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील, स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय शिपेकर तर आभार संजय रोकडे यांनी मानले.
फोटो ओळी: नुतन उपसरपंचपदी विजय रोकडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आनंदराव पाटील, प्रकाश धस, एस. वाय. यमगर, बाजीराव पाटील, डॉ. एन. के. पाटील, कल्पनाताई यमगर, सुजाता देशमाने व सर्व सदस्य (छाया पायल फोटो बिळाशी)