दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवली, पण एका अटीवर; RBI ने दिली नवी अपडेट

0
92

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

भारतीय रिजर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत दिली होती.

ही घोषणा केली तेव्हा दोन हजारांच्या ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यापैकी आता फक्त ०.१४ लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा होणे बाकी आहे. दरम्यान, आरबीआयने ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा जमा करण्याची मुदत वाढवली आहे.

पण ही प्रक्रिया आरबीआयने निश्चित केलेल्या १९ कार्यालयांमध्येच होणार आहे.नोटा बदलण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था आरबीआय़ने निश्चित केलेल्या १९ ऑफिसमध्ये टेंडर करू शकतात. तिथून भारतातील त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

दोन हजार रुपयांच्या नोटा पोस्टाने त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आरबीआयने सांगितलेल्या १९ कार्यालयांपैकी एका ठिकाणी पाठवता येतील. त्यानंतर ती रक्कम खात्यावर जमा केली जाईल.

आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी १९ आरबीआय़ कार्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगढ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, तिरुवनंतपुरम इथल्या कार्यालयांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here