उंड्री येथील प्रेरणाची प्रेरणादायी वाटचाल :- मेकअप आर्टिस्ट स्टुडिओची कोल्हापुरात केली स्थापना

0
365


आंबा प्रतिनिधी उज्वला लाड :-
शिक्षण घेतल्यानंतर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीच मिळावी अशी विचारसरणी असणारी बरेच लोक खेडो पाड्यात आढळतात.

आजही मराठी जन माणसात व्यवसायापेक्षा नोकरीला प्राधान्य दिले जाते. परंतु या विचारसरणीला बगल देऊन उंड्री तालुका पन्हाळा या गावातील कु. प्रेरणा बाजीराव कुदळे या उच्च शिक्षित युवतीने आधुनिक मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रात करियर केले आहे.

तिने प्राईम लोकेशनला कोल्हापुरातील राजारामपुरी तिसरी गल्ली येथे महेंद्र ज्वेलर्स च्या समोर प्रेरणा मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी हा स्टुडिओ स्थापन केला आहे.


या स्टुडिओचे नुकतेच उदघाटन तिचे वडील श्री. बाजीराव कुदळे यांच्या हस्ते झाले. प्रेरणा हिचे प्राथमिक शिक्षण उंड्री या गावात झाले.

हे गाव फारसे प्रगत नसले तरी तिने कोल्हापूर येथून एमटेक ची पदवी प्राप्त केली व वेगळ्या धाटणी चे करिअर करण्यासाठी ती मुंबईला गेली. मुंबई येथून तिने प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नावाचा आधुनिक कोर्स केला व या ज्ञानाच्या जोरावर कोल्हापूर येथे हा स्टुडिओ स्थापन केला. स्वतःचा व्यवसाय करत आपल्यासारख्याच जिज्ञासू युवतींना कौशल्य

मिळवून देण्यासाठी ती अकॅडमी ही चालवत आहे. सध्या मॉडर्न युवक युवतिनं मध्ये विवाहपूर्व विवाहनंतर प्री-वेडिंग ,पोस्ट वेडिंग असे फोटोशूट केले जाते. सध्या बेबी शॉवर , बारसे , अशा विविध प्रसंगी मेकअप आर्टिस्ट ना जोरदार मागणी आहे.

या व्यवसायात करिअर करता येऊ शकते हे हेरून तिने हा मार्ग निवडलेला आहे. ती ब्रायडल प्री-वेडिंग ,वेडिंग अशा विविध समारंभासाठी आवश्यक असणारी मेकअपची सुविधा मागणीनुसार कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरात पुरवणार आहे

,व या सोबतच या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या युवतिनं साठी प्रोफेशनल अँड मेकअप आर्टिस्ट नावाचा कोर्से या अकॅडमीत शिकवला जाणार आहे . अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेऊनही वेगळ्या धाटणीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रेरणाला तिचे वडील बाजीराव कुदळे यांनी पाठबळ दिले. उंड्री सारख्या खेडेगावातून आलेल्या या तरुणीला तिच्या व्यवसायासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here