वारणा दूध संघ : म्हैस दूध दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ

0
122

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील

म्हैस दूध दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ, वारणा दूध संघाच्या सभेत विनय कोरेंची घोषणा
वारणा दूध संघाने अहवाल सालात सुमारे १३८९ कोटीं रुपयांची वार्षिक उलाढाल केली आहे. फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याबाबत निर्णय वारणा दूध संघाकडून घेण्यात येणार असून त्यानुसार म्हैस दूध उत्पादकास फरक बिल नको असल्यास सध्याच्या दूध दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ आणि फरक बिल हवे असल्यास सध्याच्या दरात १ रुपयांनी वाढ देण्यात येऊन अडीच रुपये प्रमाणे फरक बिल देण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वार्षिक सभेत केली.


येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाचे कार्यस्थळावर पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करून दुग्ध व्यवसायासमोर अनेक आव्हाने असताना या परिस्थितीला सामोरे जाऊन संघाने यशस्वी वाटचाल केल्याचे सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.डॉ. कोरे म्हणाले, संघाच्या दूध संकलन वाढीच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या. कोरोना महामारीचे संकट आणि जनावरांमध्ये शिरलेल्या लम्पीसारख्या आजारामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. अशा काळात वारणेने दूध उत्पादकांना दूध दर, विविध सवलती, फरक बिलासारखे लाभ दिलेत.

सहकारी तत्वावरील संस्था मोडीत काढण्याचा बाहेरील कंपन्या जादा दराचे आमिष दाखवून कुटील डाव काही लोक करीत आहेत. यावर पर्याय म्हणून फरक बिल वाटप पद्धतीत बदल करण्याचा निर्णय वारणेने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here