प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
नांदेड : येथील विष्णुपूरीतील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तातडीने नांदेडला रवाना होणार आहेत.
आज दुपारी ते शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करणार आहेत.मंत्री हसन मुश्रीफ हे आज दुपारी एक वाजता नांदेडकडे रवाना होतील दुपारी तीन ते चार या वेळेत ते रुग्णालयाची पाहणी करतील.
त्यानंतर दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषदह घेतील आणि पाच वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना होतील.याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, रुग्णालयात जे मृत्यू झालेत त्याची सखोल चौकशी करु आणि जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल.
याठिकाणी स्टाफ पुरेपुर होता. औषधांचा साठाही पुरेपुर होता. पण गंभीर अवस्थेत रुग्णांचं दाखल होणं, खूपवेळाने अॅडमिट होण, सर्पदंश झालेले रुग्ण दाखलहोण, अपघातग्रस्त रुग्ण दाखल होणं, अशा प्रकारचे रुग्ण दाखल झाले होते, त्यामुळे या घटना घडल्या.
पण विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मी तर दोन महिन्यापूर्वी आलेला माणूस आहे. मी पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि यापुढे अशा घटना घडणार नाही, याचीही काळजी घेईल, असे आश्वासनही हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. नांदेड हा त्यांचा मतदारसंघ आहे. पण त्यांनी या रुग्णांच्या मृत्यूमागे राजकारण करता कामा नये. तिथे मृत्यू कसे झाले, त्या प्रत्येक मृत्यूची मी चौकशी करणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.