प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: थोरला दवाखाना म्हणून छत्रपती प्रमिलाराजे(सीपीआर) जिल्हा रुग्णालयाची ओळख जिल्हा भरातल्या शेवटच्या माणसाला आहे. गोर गरिबांना आधार ठरलेली ही वास्तू वेदनांना मुक्ती देते.
खर तर कोणाला ही आजारपण येऊ नये, अशी इच्छा बाळगली तर हा वारसा जपावा कसे म्हणावं? पण आजार असो किंवा अपघात असो, या प्रसंगात हीच वास्तू धीर देत आली. पण गेल्या महिन्याभरात २२८ रूग्णाचा मुत्यू झाला आहे.
यामध्ये २९ नवजात बालकांचा समावेश आहे राज्यकर्त्यांनी सत्तेच्या सारीपाटाच्या खेळातून बाहेर पडून थोरल्या दवाखान्याकडे लक्ष द्यावे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्याकडून उमटवू लागल्या आहेत.