दिग्गज उद्योगपती एका झटक्यात कंगाल; 16000 कोटींची कंपनी 74 रुपयांना विकावी लागली

0
64

 हजारो कोटींची संपत्ती असलेली व्यक्ती एका रात्रीत रस्त्यावर आली, असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, एकेकाळी अब्जाधीश असलेल्या बीआर शेट्टी (बावगुत्तू रघुराम शेट्टी) यांच्यासोबत अशीच घटना घडली आहे.

शेट्टी यांच्याकडे 18000 कोटी रुपयांची संपत्ती होती. दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये 2 मजले, प्रायव्हेट जेट, आलिशान कार आणि पाम जुमेराहमध्ये मालमत्ता, अशा सर्व सुखसोयी शेट्टींकडे होत्या. पण, एका ट्विटने त्यांनी संपूर्ण संपत्ती गमावली.

ज्याप्रमाणे हिंडेनबर्ग प्रकरणात गौतम अदानी यांनी आपली संपत्ती गमावली, तसाच काहीसा प्रकार बीआर शेट्टी यांच्या बाबतीत घडला. परिस्थिती अशी बनली की, त्यांना 2 बिलियन डॉलर्स (16,650 कोटी) ची कंपनी फक्त 1 डॉलरला (74 रुपये) विकावी लागली.

पाण्यासारखा पैसा वाहून गेला
जगातील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक असलेल्या बुर्ज खलिफामध्ये बीआर शेट्टी यांच्या मालकीचे 2 मजले होते. तिथे ते नेहमी लक्झरी पार्ट्या आयोजित करायचे.

त्यांच्याकडे प्रायव्हेट जेट, रोल्स रॉयस आणि मेबॅक सारख्या आलिशान गाड्या होत्या. दुबईच्या पाम जुमेरा आणि वर्ल्ड सेंटरमध्येही शेट्टींची मालमत्ता होती.

एका ट्विटने सर्व काही संपले
2019 मध्ये यूकेच्या मडी वॉटर्सने, बीआर शेट्टी यांच्या NMC हेल्थ कंपनीबद्दल एक ट्विट केले. ही UAE मधील सर्वात मोठी खाजगी हेल्थ ऑपरेटर होती. कंपनी लंडन स्टॉक एक्स्चेंजवरही लिस्टेड होती. मडी वॉटर्सने NMC हेल्थबाबत एक रिपोर्ट प्रकाशित केली, ज्यामध्ये कंपनीतील आर्थिक अनियमिततेबाबत अनेक दावे करण्यात आले.

कंपनी 1 डॉलरला विकली
रिपोर्टमध्ये म्हटले की, एनएमसी हेल्थ कर्ज कमी करुन रोख व्यवहार वाढवत आहे. ही कंपनी मडी वॉटरच्या रडारखाली आल्याने शेट्टींना मोठा फटका बसला. कंपनीतील अनियमिततेच्या दाव्यांमुळे शेअर्सची विक्री सुरू झाली आणि काही वेळातच शेट्टी कुटुंबाची संपत्ती $1.5 अब्जने कमी झाली. शेअर्सच्या विक्रीमुळे कंपनीचे मूल्य पूर्णपणे नष्ट झाले.

याशिवाय कंपनीवर 1 अब्ज डॉलरचे कर्ज असल्याचे आढळून आले. एकेकाळी कंपनीचे मूल्य 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते, पण परिस्थिती अशी झाली की, शेट्टींना त्यांची कंपनी 1 डॉलरला विकावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here