कोल्हापूर: येथील महावीर महाविद्यालयाच्या एनसीसी, सांस्कृतिक व वाचन कट्टा विभागाच्या वतीने गांधी जयंती निमित्त आयोजित विशेष व्याख्यानामध्ये डॉ. अशोक चौसाळकर यांनी महात्मा गांधींनी अहिंसेच्या जोरावर जग जिंकले असे प्रतिपादन केले.’
गांधी समजून घेताना ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनाचा आढावा घेतला त्यांनी उभारलेली आंदोलने, त्या आंदोलनाची विशेष कार्यपद्धती, अहिंसा, जाती निर्मूलन, ग्रामविकास महिला सबलीकरण या सर्वच विषयांची चर्चा डॉ.चौसाळकर यांनी केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र लोखंडे होते त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या वरील उपलब्ध विपुल साहित्याचे वाचन करावे असे प्रतिपादन केले.
डॉ. प्रकाश कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ. शरद गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.प्रकश चव्हाण यांनी सूत्रसचालन केले तर कॅप्टन उमेश वांगदरे यांनी सर्वाचे आभार मानले.
या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे, डॉ शरद गायकवाड, डॉ प्रकाश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ.भरत नाईक, डॉ उषा पाटील, डॉ अविनाश लोखंडे,डॉ अंकुश गोंडगे,डॉ संजय ओमासे, डॉ प्रदीप गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते