पाहुण्यांच्या घरी नेऊन मुलीवर अत्याचार,१० वर्षांची सक्तमजुरी

0
76

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सचिन परशुराम पवते (वय २७, रा. परिते, ता. करवीर) याला जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी बुधवारी (दि.

४) झालेल्या सुनावणीत दोषी ठरवले. त्याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली. मार्च २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता.

सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी करवीर तालुक्यातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. १५ मार्च २०१८ रोजी महाविद्यालयात निघालेल्या मुलीचे आरोपी सचिन पवते याने अपहरण केले.

त्यानंतर पाहुण्यांच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मुलगी घरी न आल्याने ती बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.

पोलिसांकडून शोध सुरू असताना तीन एप्रिल २०१८ ला ती स्वत:हून करवीर पोलिस ठाण्यात हजर झाली. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी पवते याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील कुलकर्णी यांनी न्यायालयात नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि पीडित मुलीची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पवते याला शिक्षा सुनावली.

या गुन्ह्याचा तपास करवीर पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. बी. तिबिले आणि हवालदार ए. एम. पाटील यांनी केला. पैरवी अंमलदार म्हणून सागर पोवार आणि माधवी घोडके यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here