नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा ठपका गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर

0
83

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

नांदेड :शासकीय रूग्णालयातील मृत्यूचा मुद्दा सूरू असतानाच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

या मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश होता.बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगितलं.

रक्त व इतर तपासण्यासाठीही देखील पैसे खर्च करावे लागले. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं.नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये २२ वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली.

तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली.

त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here