राधानगरी तालुक्यातील मोघर्डे येथील चंद्रकांत दाजी पाटील वय 71 या शेतकऱ्यास झोपेत उंदीर चावल्याने आज सकाळी निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोघडे येथील चंद्रकांत दाजी पाटील वय 71 हे आपल्या शेताचे काम आटपुन घरी आले आणि रात्री जेवून करून झोपले असता
पहाटे अचानक पायाला उंदीर चावल्याने त्या पायाला जखम झाली असल्याचे सकाळी लक्षात आल्यावर सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार चालू असताना चंद्रकांत पाटील या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.