समृद्धी महामार्ग राहणार पाच दिवस बंद; का आणि कधी? काय आहे पर्यायी वाहतूक व्यवस्था

0
95

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

समृद्धी महामार्ग ऑक्टोबर महिन्यात पाच दिवस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे.

मुंबई-नागपूर प्रवासाठी अतिशय महत्वाचा असलेला समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. हा मार्ग या महिन्यात काही ठराविक वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दोन टप्प्यात हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान हा मार्ग बंद ठेवला जाणार आसल्याने बंद काळात या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी हा मार्ग छत्रपती संभाजी नगर ते जालना दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. सुरवातीला १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान हा मार्ग बंद राहणार आहे.

दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३ दरम्यान हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळात या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे.

पहिला टप्प्यात हे काम १० ते १२ म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार हे तीन दिवस तर दुसरा टप्पा २५ आणि २६ म्हणजेच बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस बंद राहणार आहे.

जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान या मार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात येणार असून इतर भागातील वाहतूक ही सुरळीत राहणार आहे.

बंद काळात अशी असेल वाहतूकसमृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६(छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर, समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक ही सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे वळवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here