कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी मंदिराच्या भिंतीला लागून असलेली चप्पल स्टँड तसेच सर्वच दुकाने काढत असताना अतिक्रमण विभाग आणि दुकानदारांमध्ये मोठा राडा झाला.
यावेळी महिलांनी दुकाने काढण्यास कडाडून विरोध केला.
महानगरपालिकेने जेसीबीने मंदिराच्या परिसरातील अनाधिकृत दुकाने हटवण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानदारांनी कारवाईला विरोध केला. मात्र, अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवत सर्वच दुकाने काढली. यावेळी महिलांनी कडाडून विरोध केला. काही महिलांना अश्रु अनावर झाले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम सुरु आहे. महापालिकेनेही मंदिर परिसरातील अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु केली आहे. मंदिराच्या भिंतीला लागूनच चप्पलांचे स्टँड आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवे आणि अधिकृत चप्पल स्टँड उभं केले आहे. मात्र जे खासगी चप्पल स्टँडमुळे मंदिराची भिंत झाकली गेली होती. त्यामुळे हे अतिक्रमण मनपाने हटवले.