हिंदी एक लोकप्रिय भाषा:प्राचार्य डॉ. सोमकांत जावरकर

0
56

हिंदी भाषा सातत्याने लोकप्रिय होत आहे .सोशल मीडियासह सर्वच प्लॅटफॉर्मवर हिंदीचा बोलबाला आहे. हिंदी बोलू आणि समजू शकणाऱ्या लोकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे .

हिंदी मध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत असे प्रतिपादन एस.डी. पाटील इन्स्टिट्यूटच्या फार्मसी कॉलेज इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. सोमकांत जावरकर यांनी केले ते डॉ.घाळी कॉलेज हिंदी विभाग द्वारा आयोजित हिंदी पखवाडाच्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारोह प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाला सहसचिव मा. गजेंद्र बंदी डॉ. घाळी कॉलेजचे प्र-प्राचार्य डॉ. शिवानंद मस्ती उपप्राचार्य डॉ.नागेश मासाळ उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.सरोज बिडकर यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात कु.रतन गुरव यांच्या स्वागत गीताने झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पूजन आणि अक्षरधन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काव्यवाचन,सामान्य ज्ञान आणि निबंध स्पर्धेत यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय भाषण केले.कु. साक्षी तिबिले या विद्यार्थिनीनीने आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.रोहिणी खंदारे यांनी केला.सूत्रसंचालन कु. विना खोत,कु.स्वाती वाळकी यांनी आणि आभार डॉ.दयानंद पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:काव्यवाचन=प्रथम-दाही अत्तार,द्वितीय-संजना मिरजे, तृतीय-राहुल नावेॅकर उत्तेजनार्थ-विणा खोत,साक्षी माने, सामान्यज्ञान =प्रथम-दाही अत्तार, द्वितीय-मुक्ता देसाई, तृतीय-विनायक दुंडगे,उत्तेजनार्थ =दिपाली पाटील,गौरी कुरबेट्टी, प्रणव लोहार, पाथॅवी पाटील, निबंध स्पर्धा =प्रथम-सानिका गुरव, द्वितीय-सानिका शिखरे,तृतीय-साक्षी तिबिले, उत्तेजनार्थ =अक्षता तिप्पे, पुनम मोरे, प्राची शेट्टी, स्वाती दळवी, विशाखा लोहार, स्वाती वाळकी, चैत्राली कुणके,विद्याश्री चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here