वाळोली/पोर्ले तर्फ बोरगाव बंधाऱ्यात अडकला कचरा

0
69

बाजार भोगावं प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

पन्हाळा तालुक्यातील वाळोली पोर्ले तर्फ बोरगाव या गावी कासारी नदीपात्रावरती असणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये लाकडी कोंडके व कचरा अडकून राहिला आहे

तालुक्यात झालेल्या पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेले लाकडी ओंढके झाडे व कातेरा बंधाऱ्यात अडकून राहिल्यामुळे बंधाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे .

याच कासारी नदीपात्रावरती असणाऱ्या बर्की ता शाहूवाडी येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक पिलर ढासळला असल्याची घटना ताजी असून बंधाऱ्याच्या सुरक्षिततेत बाधा आणणारे लाकडाचे ओंढके व कातेरा पाटबंधारे विभागाने त्वरित काढावा व बंधाऱ्यामध्ये बर्गे टाकून पाणी आडवावे त्यामुळे मे २०२३ अखेर उद्भवलेल्या पाणीटंचाई सारख्या समस्येवरती मात करता येईल या दृष्टीने पाटबंधारे विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here