कोल्हापूर मध्ये घडला धक्कादायक प्रकार महिलेला दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना

0
115

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : स्टेशन रोडवर थांबलेल्या देहविक्रय करणाऱ्या महिलेला (३२) दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून आणि तोंडाला रुमाल लावून अपहरण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली.

हा प्र कार लक्षात येताच पोलिसांनी पाठलाग करून कार अडवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी धावत्या कारमधून उडी मारून महिलेने सुटका करून घेतली. स्टेशन रोडवरील एका बेकरीसमोर संबंधित महिला उभी होती. त्यावेळी कारमधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल लावून तिला कारमध्ये बसवले.

त्यानंतर कार स्टेशन रोडवरून भवानी मंडपकडे गेली. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजित चव्हाण यांनी एका होमगार्डसह दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला.

वेग कमी झाला अन्..
जिल्हा न्यायालयाच्या दिशेने गेलेल्या कारच्या पुढे जाऊन पोलिसांनी धाडसाने कार अडवण्याचा प्रयत्न केला. गती कमी होताच महिलेने उडी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here