झंकार इंटरटेनमेंट आणि मयुरी डान्स स्टुडिओ आयोजित रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात उत्साहात संपन्न..

0
456

सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक 16- 10 -2023 रोजी पांडुरंग माने हॉल फुलेवाडी येथे आणि मयुरी डान्स स्टुडिओ आयोजित रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या.हा कार्यक्रम लाईव्ह बँड होता.

हा कार्यक्रम घेण्या आधी आधी तीन दिवसाचा वर्कशॉप होता.तीन दिवसाच्या वर्कशॉप मध्ये रास गरबा दांडिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेले स्पर्धकांना तीन दिवस वर्कशॉप मध्ये कोरिओग्राफर आणि मॉडेल मयुरी विशाल सुतार यांनी मार्गदर्शन प्रशिक्षण दिले.यामुळे जो ग्रँड इव्हेंट होता तो मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला.

रास गरबा दांडियासाठी महिलावर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमा वेळी बेस्ट ग्रुप, बेस्ट डान्स ,स्पॉट गेम्स, मिसेस गरबा क्वीन असे विविध राऊंड घेऊन विजेतांना गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल यांनी काम पाहिले.हा कार्यक्रम उत्तम होण्यासाठी आयोजक मयुरी विशाल सुतार व विशाल सुतार आणि सुतार परिवार यांनी खूप परिश्रम घेतले.शिस्तबद्ध व नियोजन पूर्वक कार्यक्रम उत्तम पार पडला.या कार्यक्रमा मध्ये लहान लहान मुला मुलींनी स्पर्धेत भाग घेऊन कला सादर केली.या कार्यक्रमासाठी प्रायोजक
वनकुद्रे बंधू,
लक्ष्मी वाकडे ज्वेलर्स
सुरजमल ज्वेलर्स, सुभाष गुंदेशा
अभिजीत वेदाज निर्मिती हे होते. या स्पर्धेचे परीक्षण
अलिशा भानुशाली यांनी केले.या कार्यक्रमा वेळी झंकार बिट्स गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नामांकन झाल्यामुळे मुकुंद सुतार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे
मीडिया पार्टनर म्हणून SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल काम पाहिले.या रास दांडिया गरबा स्पर्धेमध्ये मिस गरबा क्वीन विजेती डॉ.प्राजक्ता पाटील ,
मिस गरबा क्वीन रनर अप

रोशनी फरास यांनी मान पटकावला.
तसेच या स्पर्धेमध्ये श्रीमती गरबा क्वीन विजेती
रुबिना फरास,
मिसेस गरबा क्वीन उपविजेती
कुमुदिनी जाधव यांनी मान पटकावला.
या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम पोशाख म्हणून रेवा वनकुद्रे,कल्याणी शिपुगडे,पूनम वेसणेकर यांना बहुमान मिळाला.
त्याचबरोबर बेस्ट किड्स मध्ये उत्कर्षा गायकवाड, सुमंथू कोपर्डेकर,नुपूर कांबळे,एस्टर डिसोझा,गायत्री कोपर्डेकर यांनी मिळवला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
वनकुद्रे बंधू,SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील,सुभाष गुंडेशा
संध्या पाटील (वेदाची निर्मिती)
मुकुंद सुतार (झंकार बीट्स)प्रकाश सुतार,सरिता सुतार आणि मोठ्या प्रमाणात महिला प्रेक्षक वर्ग सर्व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here