गोकुळ’ कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

0
79

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : गोकुळ दूध उत्पादक संघांच्या च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील बाचणी,(ता.कागल) यांचा थायलंड येथे झालेल्या आशियाई महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केलेबद्द्ल.

तसेच पशुवैद्यकीय डॉक्टर संजय डोंगळे घोटवडे,(ता.राधानगरी ) यांचा लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोटवडे व पंचक्रोशीत उत्कृष्ट सेवा दिलेबद्दल व अमर पाटील करंजफेण,(ता.पन्हाळा) यांचा वाघाबॉर्डर (अमृतसर) येथे सैन्यदलातील बी.एस.एफ. मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार.

संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प,गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत असून जिल्ह्याचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करत आहेत.

अशा व्यक्तींना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम गोकुळने केले आहे. सर्व सत्कारमूर्तींची कामगिरी ही कौतुकास्‍पद आहे त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सबोधित करताना अजित पाटील म्हणाले कि, “गोकुळने नेहमीच जिल्ह्यातील खेळाडूंना व क्रीडाक्षेत्रास प्रोत्साहन दिले आहे असे उद्गागार त्यांनी याप्रसंगी काढले.

यानंतर अमर पाटील म्हणाले कि महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमितील गोकुळ दुध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी अंबाबाई महिला सहकारी दूध संस्था सावर्डे खुर्द,(ता. कागल ) या संस्थेचे दूध उत्पादक पांडुरंग कदम यांचा आदर्श दुध उत्पादक म्हणून गोकुळ संघामार्फत सत्‍कार करण्यांत आला. त्यांनी स्वतः मुऱ्हा जातीच्या १५ म्हैशी तयार केल्या आहेत. त्याचे प्रतिदिनी १०० लिटर दूध संकलन करून संघास पाठवतात. एक यशस्वी दूध उत्पादक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे,अंबरिषसिंह घाटगे, शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बयाजी शेळके,संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बाळासाहेब खाडे, युवराज पाटील,अजित नरके,राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक, संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, गोकुळ दूध उत्पादक संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here