कोल्हापूर : लाच घेतल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केले होते. त्यांच्या रिक्त जागी निलिमा सुर्यकांत अडसूळ यांची नियुक्ती झाली.
याबाबतचे आदेश बुधवारी रात्री क्रीडा उपसंचालक कार्यालयास मिळाले.
अडसूळ या यापुर्वी क्रीडा व युवा सेवा संचालनालयाच्या सहाय्यक संचालक, पुणे येथील कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांची प्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी या ठिकाणी बदली करण्यात आली होती.
सुधारीत आदेशामध्ये अंशत: बदल करून त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत. याबाबतचे आदेश शिक्षण व क्रीडा विभागाचे कार्यासन अधिकारी ज्ञानेश्वर आव्हाड यांनी बुधवारी रात्री काढले.