कोपरगाव (जि. अहमदनगर) : ‘तु दुसऱ्या तरूणासोबत का बोलतेस’ म्हणून रागावलेल्या काकाने विवाहित पूतणीवर कुऱ्हाडीने वार केले. यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोपरगाव शहर पोलिसांनी काकाला अटक केली आहे.
बुधवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या खडकी भागात घडली.
नेहा संदीप कांबळे (वय २१, ह.मु. सप्तशृंगी मंदीराजवळ खडकी) असे मयत महिलेचे नाव असून संतोष हरीभाऊ आरणे (वय २६, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेहा संदीप कांबळे ही अनेक दिवसांपासून माहेरी म्हणजे आई ज्योती नंदकिशोर आरणे यांच्याकडे खडकी भागातील सप्तशृंगी माता मंदिराजवळ राहात होती.
बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ती घराबाहेर लघुशंकेसाठी आली होती. यावेळी नेहाचा काका संतोष आरणे हा तीथे आला. ‘तु दुसऱ्या तरूणासोबत का बोलतेस’ म्हणून तीच्याशी भांडू लागला.
दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने नेहाच्या दोन्ही पायांवर सोबत आनलेल्या कुऱ्हाडीने वार केले. जखमी असस्थेत नेहाला तीथेच सोडून संतोष आरणे पळून गेला. जखमी नेहाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोंचले. पंचनामा केल्यानंतर लगेचच शोध घेऊन संतोष आरणे यास अटक केली आहे.
याघटनेबाबत मयत नेहाची आई ज्योती नंदकिशोर आरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष आरणे याच्या विरूद्ध भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.
काका-पूतणी होते अनैतिक संबंध
मयत नेहा संदीप कांबळे व तिचा काका संतोष आरणे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. नेहा माहेरी आल्यानंतर ती दुसऱ्याशी बोलल्याचा राग संतोषला आला व त्याने तीचा खून केला. आरोपी पोलिस कोठडीत असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.
फोटो- १९ नेहा कांबळे