एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार; महामंडळाची मोठी घोषणा

0
334

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत.

हे अनुदान दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सानुग्रह अनुदानासोबतच सण आग्रिम म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ सातत्यानं चर्चेमध्ये आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं.

कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होतं. मात्र आता एसटीची गाडी हळूहळू रुळावर येत असून, एसटी कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here