अमली पदार्थाविरोधात कारवाई करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोल्हापुरात निदर्शने

0
67

कोल्हापूर : भविष्यामध्ये महाराष्ट्रासह कोल्हापूर नशेखोरांचं आणि अमली पदार्थाचे सध्या केंद्र बनतेय प्रशासनाने याविषयी योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

गोवा आणि कर्नाटकच्या हद्दीवर वसलेल्या कोल्हापुरातून अमली पदार्थाची सुलभ ने-आण, वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याविरोधात कारवाई करण्याची रेखावार यांच्याकडे मागणी अरुण दुधवडकर आणि संजय पवार यांनी केली. यावेळी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

दूधवडकर म्हणाले, व्यसनमुक्ती केंद्रासारख्या ठिकाणी सुद्धा अंमली पदार्थ सापडत आहे, हे अत्यंत धोक्याचे आहे. दरवेळेला प्रशासनानं अमली पदार्थ व अवैध धंद्याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम उघडायची आणि काही गोष्टी व्यवस्थित सुरळीत झाल्या की पुन्हा ते बंद करायचं, अमली पदार्थाचे सूत्रधार सुद्धा पोलिसांना माहित आहेत परंतु पोलीस त्यांना सुरक्षितपणे त्यांचं रक्षण करायचं काम करतात का ? असा प्रश्न त्यांनी केला.

संजय पवार म्हणाले, लढवय्या असणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोल्हापूरचा थोर विचाराची सामाजिक पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या या वीर व थोर भूमीला अंमली पदार्थाचे केंद्र बनू देणार नाही.

प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवत नशेखोरांना व आमली पदार्थाच्या सर्व ज्ञात असणाऱ्या ठिकाणावरती छापे मारून हे अमली पदार्थ व त्या सूत्रधारांना त्वरित अटक करावे अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.

यावेळी विजय देवणे,सुनील शिंत्रे, मुरलीधर जाधव,सरदार तीप्पे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, सुरेश पोवार, रणधीर पाटील, सतीश पानारी, संभाजी भोकरे, अरुण अब्दागिरी, स्मिता सावंत, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर, प्रेरणा बाकळे, रणजित आयरेकर, मंजित माने, विशाल देवकुळे, पोपट दांगट, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here