निपाणीत शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून, चार संशयित ताब्यात

0
63

निपाणी : शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार निपाणी शहराबाहेरील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. साकिब समीर पठाण (१४) रा. संभाजीनगर असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

या घटनेची अधिक माहिती अशी, पठाण कुटुंबीय हे जुने संभाजीनगर येथे किरायाच्या घरात वास्तव्यास आहेत. खून झालेला साकिब हा आठवी इयतेमध्ये शिकत होता. गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता तो घराबाहेर पडला होता.

रात्री उशिराही तो घराकडे परतला नाही. दरम्यान, शक्रवारी सकाळी त्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळूमामानगर येथे होत असलेल्या नवीन घराच्या बाजूस त्याचा मृतदेह आढळून आला.

याची माहिती मिळताच साकिब याची आई, वडील समीर, लहान भाऊ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी साकिब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुलेद, चिकोडीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

खून झालेला परिसर सील करून पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत साकिबची आई सिमरन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याचबरोबर चार संशयितांना ताब्यात घेऊन तपासही सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here