करंजफेण (ता.शाहूवाडी) येथील कु.सारांश सुभाष कारंडे (वय २वर्ष) यांच्यावर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

0
180

शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण गावचे रहिवासी श्री.सुभाष कारंडे यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपल्या मुलांची व्यथा मांडली होती. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये कु.सारांश त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १ लाख ३० हजार रु.अपेक्षित खर्च येणार होता. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोन वरून चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले.

आज वारणानगर येथे जनसंपर्क कार्यालयात श्री.सुभाष कारंडे यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची भेट घेतली. आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी कु.सारांशला शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय बंगे,शिवाजी पाटील (मेजर),चंद्रकात गायकवाड,शंकर गायकवाड,युवराज पाटील (आबा),नामदेव पोवार,सर्जेराव पाटील – इजोलीकर,सुनिल सावंत,आंनदा कांबळे,राजाराम कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here