राशिवडे खुर्द बेले ता.राधानगरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.सत्याप्पा अकोबा कांबळे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. ठरल्याप्रमाणे माजी उपसरपंच अशोक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकनियुक्त सरपंच इंद्रजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती करण्यात आली.
भोगावती कारखान्याचे माजी संचालक, के. डी. सी. बँकेचे मा. चेअरमन कृष्णराव किरूळकर यांच्या नेतृत्वाखाली आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे हे पद सत्याप्पा कांबळे यांच्याकडे देण्यात आले.
या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आताशबाजी सत्याप्पा कांबळे यांच्या समर्थकांनी केली. या निवडीचे स्वागत ग्रामसेवक सागर सरावने, यांनी, प्रास्ताविक मच्छिंद्र पाटील यांनी तर आभार नाथाजी पाटील यांनी मानले. या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.