प्रतिनिधी – अभिनंदन
पुरीबुवा कोल्हापूर : आज सकाळी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर सकल मराठा समाजाने पालकमंत्री हसन मुश्रीफाना रोखल होत. त्यानंतर गारगोटीत ता भुदरगड मध्ये ही सकल मराठा समाजाने मुश्रीफांना रोखलं आहे.
यावेळी मुश्रीफांचा ताफा अडवून जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांना गाडीतून खाली उतरावं लागलं. जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय नेत्यांना फिरणं आता हळूहळू अवघड होवू बसणार आहे.