राधानगरी- प्रतिनिधी, विजय बकरे
मराठा आरक्षणसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा काढण्यात आला .
गावातील सर्व मराठा बांधव गावाच्या मध्य ठिकाणी हनुमान मंदिर पार येथे एकत्र आल्यावर मराठा आरक्षणचे महत्व याबाबत केदारलींग सोसायटी चेअरमन प्रवीण बेलेकर व गणेश खतकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर गावातून कॅण्डल मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात येत होत्या या कॅन्डल मोर्चात लहान मुला-मुलींपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते मोर्चाचा शेवट एसटी बस थांब्याजवळ करण्यात आला.
या मोर्चासाठी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता मोर्चामध्ये सरपंच विनोद कांबळे भुदरगड तालुका संघ संचालक बजरंग सुतार उपसरपंच सागर खतकर ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष संभाजी खतकर तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. रणजीत मोरे सोपान खतकर उत्तम खतकर आदींनी केले शेवटी आभार सोपान खतकर यांनी मानले