SP9/ कोल्हापूर प्रतिनिधी
कोकरूड ता. शिराळा येथील आदर्शवत महिला सौ संगिता अशोक पाटील यांना निर्भया असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराने ॲंन्टीकरप्शन कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशिद आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात गायिका माऊली गावडे हिच्या
सुरेल गायनाने करण्यात आली.
कोकरूड येथील संगिता पाटील यांनी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना केली.
गावातील विविध सामाजिक, धार्मिक उत्सवामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. या त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान आला आहे.
संगिता पाटील यांना मिळवलेल्या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराबद्दल कोकरूड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी माजी महापौर निलोफरनिलोफर आचरेकर, कळंबा कारागृहाचे उपअधीक्षक साहेबराव आडे, एसपी नाईनचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, प्रा. मेघा पाटील, निर्भयाच्या सुनिता हनिमनाळे,डॉ. सिमा ईंग्रोळे, संध्या महाजन, बाळासाहेब हादीकर, धनंजय पाटील, संपादक विजय काळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते