दारूसाठी पैसे न दिल्याने दोघांनी दगडाने ठेचून केला मजुराचा खून

0
64

पिंपरी : दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मजुराचा दगडाने ठेचून खून केला. चऱ्होली बुद्रुक येथील प्राइड वर्ल्ड सिटीच्या लेबर कॅम्पजवळ सोमवारी (दि. ३०) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश भंगडा भिलाला (रा. झांजर, ता. बऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

लालू जगन डावर (३३, रा. झांजर, ता. बुऱ्हाणपूर, जि. नेपानगर, मध्य प्रदेश), भुरा सीताराम किराड (२३, रा. चौपाली, हेलापडाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश. दोघे सध्या रा. प्राइड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्प, चऱ्होली बुद्रुक) यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश आणि अटक केलेले दोघे संशयित हे प्राइड वर्ल्ड सिटी येथे मजुरीचे काम करत होते. संयशित लालू आणि भुरा यांनी गणेश यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

मात्र गणेश यांनी पैसे दिले नाहीत. या कारणावरून चिडून जाऊन राग मनात धरून दोघांनी गणेश यांच्या डोक्यात, पाठीवर व इतर ठिकाणी मारहाण करून ठार मारले, असे फिर्यादीत नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here